प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – मागेल त्याला शेततळे ही योजना सरकारने गुंडाळली आहे. आता केवळ जुनीच पूर्ण करावीत नवीन कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे कृषी विभागाने कृषी अधिकाऱ्यांना कळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जलसिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटावा यासाठी कृषी विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या शेततळे अनुदानापेक्षा वेगळी अशी मागेल त्यांना शेततळे ही योजना सुरू केली होती. या योजनेत विशिष्ट आकाराच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते.
मात्र, सरकारने ही योजना आता बंद केली आहे. नवीन कामांना मंजुरी देऊ नये आणि जुनी कामे पूर्ण करून घ्यावीत असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात कृषी आयुक्तलय पुणे यांनी म्हटले आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेचे पोर्टल तर सध्या बंदच आहे. आम्हाला याबाबत अद्याप स्पष्ट आदेश नाहीत असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
tadalafil online – tadalafil 20 tadalafil cheap tadalafil