India Fight Corona: स्वावलंबी भारतासाठी २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज;

0

नव्या रंगरूपात १८मे पासून चौथे लॉकडाउन…

नवी दिल्ली : देशात १७ मे नंतर लॉकडाउन उठण्याच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला. १८ तारखेपासून देशात नव्या रंगरूपात चौथे लॉकडाउन सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याचवेळी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा मोदींनी केली.

अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा हे चक्र पूर्ण क्षमतेनं वापरलं जाण्याची गरज आहे. मागणी वाढवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण सक्षम असायला हवा. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. हे पॅकेज स्वावलंबी भारताला एक नवी गती देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या आर्थिक पॅकेजशी निगडीत संपूर्ण माहिती अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येणाऱ्या काही दिवसांत देतील, असंही पंतप्रधान त्यांनी स्पष्ट केलं.

‘करोना महामारी सुरू होऊन आता चार महिने उलटले. ४२ लाखांहून अधिक लोक करोनाबाधित आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. मी या सर्वांप्रती आपली संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसनं जगाला उद्ध्वस्त केलंय. जगभरात करोडो लोक संकाटाचा सामना करत आहेत. आम्ही असं संकट ना पाहिलंय ना ऐकलंय… निश्चितपणे मानवजातीसाठी हे सगळं अकल्पनीय आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. थकवा, हरणं, तुटणं मानवाला मंजूर नाही. सतर्क राहताना नियमांचं पालन करत यापासून संरक्षण करून पुढे वाटचाल करायची आहे. जग संकटात असताना आपला संकल्प आणखीन मजबूत करायला हवा. संकटापेक्षाही आपला संकल्प विराट हवा’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली.

२१ वं शतक भारताचं आहे, असं मागच्या शतकापासून आपणं ऐकत आलोय. करोना संकटानंतरही जगात निर्माण होणारी स्थिती आपण न्याहाळत आहोत. भारताच्या नजरेतून पाहिलं तर २१ वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर ही आपली जबाबदारीही असावी, असं मोदी म्हणाले.

सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण हेदेखील उपस्थित होते. कोरोनाकाळात मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची ही पाचवी बैठक होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून संबोधन…

https://m.facebook.com/story.php?story_fbid=265612391509912&id=115098073228012

देशात ४६,००८ कोरोनाग्रस्त

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. हे लॉकडाऊन एव्हाना तीन टप्प्यांत वाढवण्यात आलंय. देशव्यापी लॉकडाऊनच्या ४९ (१२ मार्च) व्या दिवशीही करोना फैलाव काही थांबण्याचं नाव घेईना. देशात आज सकाळपर्यंत ७०,७५६ करोनाबाधित रुग्ण आढलले आहेत. यातील २,२९३ जणांनी आपले प्राण गमावलेत तर २२,४५५ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. सध्या देशातील वेगवेगळ्यी रुग्णालयांत आणि आरोग्य केंद्रांत ४६,००८ जणांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here