Pathardi: शेती वाटणीचा वाद… पुतण्याने अंगावर ट्रॅक्टर घालून चुलत्याला ठार मारले..!

0


वजीर शेख । राष्ट्र सह्याद्री


पाथर्डी : तालुक्यातील अकोला येथे शेतजमिनीच्या वाटपावरून झालेल्या वादातून पुतण्याने चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केले. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने पाथर्डी तालुक्यासह जिल्हा हादरला.

पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे गिरी कुटुंबात शेतीच्या वाटणीवरून भांडण झाले. त्यात आरोपी तुळशीराम दत्तात्रय गिरी (वय 24 वर्ष) याने चुलते बाबासाहेब देवराम गिरी (वय 40 वर्षे) यांच्या अंगावर ट्रॅक्टर (क्र. MH-23 T.2515) घालून ठार मारले‌.

याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.न 254/2020 भा.द.वी. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे .फिर्यादी वर्षा बाबासाहेब गिरी वय 30 वर्ष यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पाठविण्यात आले, व काही तासातच आरोपी तुळशीराम दत्तात्रय गिरी यास जेरबंद केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here