Rahuri : ब्राह्मणी शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गावात आठ दिवस मटण विक्री बंद

राहुरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत आठ दिवसांपासून वाढती गर्दी लक्षात घेऊन गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने ब्राह्मणी  शुक्रवार १५ ते रविवार १७ मे पर्यंत शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी आयोजित कोरोना दक्षता ग्राम रक्षक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

गत दोन महिन्यांपासून राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना युद्धात आदर्श ठरलेल्या ब्राह्मणीत प्रतिबंधात्मक उपाय- योजना राबविण्यात येत आहे. प्रारंभी अवैध धंदे पूर्ण बंद करून यशस्वी कामगिरी पार पडली. अंतर्गत रस्ते बंद करण्याचे आले. महिनाभरापासून बस स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर गावात जाणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. सालाबाद प्रमाणे ब्राह्मणीचे ग्रामदैवत आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पुण्यतिथी सोहळा यावर्षी होणार नसला तरी त्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणीत आगामी आठ दिवस मटण/चिकन शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्यथा मटण शॉप चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

बुधवार 13 मे रोजी आयोजित दक्षता समितीच्या बैठकीत पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे,जि.प सदस्य महेश सूर्यवंशी,  लोकनियुक्त सरपंच प्रकाश बानकर, सदस्य उमाकांत हापसे, रंगनाथ मोकाटे, श्रीकृष्ण तेलोरे, विजय तेलोरे,महेंद्र  संकलेचा, गणेश लोळगे, प्रेमसुख बानकर, माणिक गोरे, सतिष तारडे, भानुदास मोकाटे, बाळासाहेब कुंभकर्ण, गिरीराज तारडे, रवींद्र वैरागर, संतोष तेलोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here