Rahuri : तहसीलदारांनी केले कापड दुकान सील

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – प्रशासनाच्या आदेशाला धुडकावून लावत आज दि. १३ मे रोजी राहुरी शहरातील मोहन कथुरिया या व्यापा-याने आपले कापड दुकान उघडून गि-हाईक करत असताना तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी कारवाई केली. तसेच सदर शितल कथुरिया या दुकानाला सील करण्यात आले आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १७ मे पर्यंत लाॅक डाऊनचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या दरम्यान राहुरी शहरात अत्यावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद आहेत. महसूल, पोलिस तसेच आरोग्य प्रशासन दिवस रात्र एक करून कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी खंबीरपणे लढा देत आहेत. त्यामुळे राहुरी तालुक्यात कोरोना विषाणूचा अद्याप शिरकाव झालेला नाही. तहसीलदार फसिओद्दीन शेख हे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

राहुरी शहरात जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता कोणालाच परवानगी दिली नाही. असे असताना राहुरी शहरातील शिवाजी रोड परिसरातील मोहन कथुरिया या कापड व्यापा-याने दिनांक १३ मे रोजी दुपारी त्याचे शितल कथुरिया हे कापडाचे दुकान सुरू करून गि-हाईक करत होते. यावेळी तहसीलदार फसिओद्दीन शेख हे शहरात गस्त घालत असताना त्यांना सदर दुकान चोरून लपून सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ सदर दुकानावर कारवाई करून दुकान सिल केले.

सदर कारवाई करते वेळी तहसीलदार फसिओद्दीन शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, राहुरी नगरपरिषद मधील महेंद्र ताकपिरे, काकासाहेब शिरसाठ, राजेंद्र खंगले, सुधीर वैद्य, योगेश शिंदे तसेच पोलिस मित्र संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here