Shrigonda : बजाज फायनान्स कंपनीच्या हप्त्याचा तगादा, हप्ते भरण्यासाठी फोन वर फोन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – कोरोना ने जगात थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात जनतेला घरातच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक ताण निर्माण होणार आहे. म्हणून शासनाने कोणत्याही बँकेचे अथवा फायनान्सचे तीन महिने हप्ते भरण्यासाठी वाढीव मुदत मिळाली असल्याचे सांगितले जात असले तरी श्रीगोंदे तालुक्यात बजाज फायनान्सने ज्या लोकांना गृहउपयोगी वस्तू घेण्यासाठी कर्ज केले आहे. त्या लोकांना हप्ता भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. आता हप्ता आणि त्याचा दंड दोन्ही भरण्यासाठी या कंपनीच्या वसुलीसाठी नेमलेल्या पंटर फोन वर फोन कर्जदाराला करत आहेत.

श्रीगोंदे शहरात बजाज फायनासचे कार्यालय आहे. या बजाज फायनासकडून अनेक लोकांना वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात पैसे दिले आहेत. हे कर्ज वसुली दर महिन्याला ग्राहकांच्या बँक खात्यातून केली जात आहे. बॅंकेतून हप्ता वसूल करण्याच्या तीन ते चार दिवस अगोदर व्हाट्सएपला सारखे मेसेज टाकत असतात, परंतु गेली एक ते दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरस या विषाणू ने थैमान जगात घातले आहे. त्यामुळे शासनाने महामारी घोषित केली आहे. त्यातच भारत सरकारने सुद्धा या महामारीमुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन केले आहे. त्यामुळे सर्व काम धंदे बंद पडले आहेत. रोजगार बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

यासाठी शासनाने तीन महिने कोणत्याही बँकेचे अथवा खाजगी फायनासचे कर्ज असल्यास ते पुढील तीन महिने भरू नका अथवा बँकांनी किंवा खाजगी फायनान्स ने तगादा लावू नये, असे स्पस्ट सांगितले असतांना देखील श्रीगोंदे तालुक्यात मात्र बजाज फायनान्सने ग्राहकांकडून वसुलीसाठी कोणत्याही प्रकारचा अगोदर मेसेज न टाकता डायरेक्ट त्यांचे वसुली कर्मचारी ग्राहकांना फोन करून सांगत आहेत की, तुमचा हप्ता बाऊन्स झाला आहे. तुम्ही लगेच दंडाच्या रकमेसह हप्ता भरा. नाहीतर तुमचे सीबील खराब होईल आणि तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक लोकांनी बजाज फायनान्स चा धसका घेतला आहे. त्यात कोरोना मुळे संचारबंदी लॉक डाऊन आहे. त्यामुळे बाहेर जाता येत नाही, कुणाकडे पैसे ऊसने मागता येत नाहीत. आत्ता या बजाज फायनान्सच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे, तरी यामध्ये जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे आणि बजाज फायनान्सची वसुली करणाऱ्यांना समज द्यावी, अशी श्रीगोंदे तालुक्यातील लोकांची मागणी आहे.

लॉकडाऊन झाल्यावर सर्वसामान्य जनतेवर आर्थिक ताण होऊ नये म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले होते की, कुणी ही बँकेचे अथवा खाजगी फायनान्सचे हप्ते तीन महिने भरू नये, जर कुणी मागितले तर मला फोन करा असे बोलले होते. तरी बजाज फायनान्स ग्राहकांना फोन करून वसुलीबाबत त्रास देत आहेत.

लॉक डाऊन आणि बंद मुळे हप्ते भरण्यास अडचणी
याबाबत शहरात अनेक कर्जदारांनी सांगितले की लॉक डाऊन असल्याने घराच्या बाहेर पडता येत नाही. याचे हप्ते भरण्याची इच्छा असताना बंद असल्याने हप्ते थकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here