पहिली बेटी, धनाची पेटी” कन्या रत्नाचं स्वागत
स्त्री भृण हत्येचा कलंक लागून बीड जिल्हा बदनाम झालेला असतानाच, तहसील कार्यालयाच्या लेखा विभागातील लिपिक अतुल खंडागळे यांना प्रथम कन्या रत्न प्राप्त झाल्याचा आनंदोत्सव हा एकवीस किलो जिलेबी वाटून त्यांनी साजरा केला आहे.
आष्टी येथील तहसील कार्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेले लिपिक अतुल खंडागळे यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या सुसंस्कारित खंडागळे कुटूंबियांनी जुन्या रुढी, परंपरेला तिलांजली देत स्त्री जन्माचे अनोखे स्वागत केले आहे. आष्टी तहसील कार्यालयातील सहकार्यांसह आपल्या मित्र परिवारात प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंदोत्सव हा एकवीस किलो जिलेबी वाटून साजरा केला. पुरुषांना स्त्रीचे सर्वच नाती हवी असतात, मग मुलगीच का नको. हीच मानसिकता समाजात बदलणे आवश्यक असल्याचे अतुल खंडागळे यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रभारी तहसीलदार वैभव महिंद्रकर, नीलिमा थेऊरकर, नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे, शारदा दळवी, पेशकार आजीनाथ बांदल, भगीरथ धारक, श्रीमती पठाडे, अशोक धोंडे, नवनाथ सोनटक्के हौसराव वाल्हेकर, मंगल पिंपळे, संगिता चितळे, मिरा नजान, विमल इघे, संतोष म्हात्रे, निर्मला धोंडे, कादर शेख, तुकाराम भवर आदींनी जिलेबीचा गोड आस्वाद घेत खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.