स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत लोकार्पण
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १४
कर्जत : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीनिम्मित कर्जत येथील राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड 19 तपासणी कक्ष स्थापन करण्यात आले. याचे लोकार्पण गुरुवारी (दि १४) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विनी वाल्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश तनपुरे उपस्थित होते.
१४ मे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथील राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री संजय राठोड़, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने आणि माजी जि.प.सदस्य प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी कोव्हीड 19 तपासणी कक्ष स्थापन केले. या कक्षाचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ आश्विनी वाल्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या कक्षात कोरोना खबरदारीसाठी आवश्यक औषधे, यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यासाठी सुरक्षा किट उपलब्ध करण्यात आले आहे. परिसरातील गरजवंत रुग्णांनी या कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवीण घुले यांनी केले आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ सबिना शेख, डॉ मधुकर काळदाते, डॉ शरदकुमार पवार यांच्यासह मुजफ्फर सय्यद, मारुती जाधव, किरण समुद्र, आर के भोसले, यांच्यासह भैय्या पाटील, भाऊसाहेब तोरडमल, अमोल कदम, दीपक मोरे आदी उपस्थित होते.
यापूर्वी सुद्धा लॉकडाऊन काळात कोरोनाच्या अनुषंगाने राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच पोलीस प्रशासन, नगरपंचायत विभाग, तालुका आरोग्य विभाग यांना वैदयकीय हातमोजे, सॅनिटायजर आणि हॅण्डवॉश वाटप केले होते. यासह एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत माजी सैनिक आणि कर्जत नगरपंचायतीचे कामगार यांचा सन्मान करत त्यांना पोषक आहार वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता.