Shevgaon : पाटाच्या पाण्यावरून वाद; एकावर खुनी हल्ला

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – उन्हाचा पारा जसाजसा जसा तापत आहे तसेच शेख मुळेचे पाणीही लाभक्षेत्रात खालील शेतकर्‍यांसाठी जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर नागरगोजे (वय २४) वर्ष, रा.भातकुडगांव यास पाटाच्या पाण्यावर मारहाण झाली. ही घटना 3 मे रोजी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

3 मे रोजी रात्री ११:३० अकराच्या सुमारास, ज्ञानेश्वर नागरगोजे यास तू‌ आमच्या चारीचे पत्रे का काढले म्हणून बेदम मारहाण करण्यात आली, असे फिर्यादी वैभव हरिभाऊ सानप यांनी म्हटले आहे. त्यानुसार शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये भा द वि  307,504, 34 प्रमाणे १) चित्तरंजन रामा घुमरे,२) प्रियरंजन रामा घुमरे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जखमी ज्ञानेश्वर याला मानाच्या हाडांना जबर मारहाण झाल्यामुळे अहमदनगर येथे हलवल्यानंतर त्याच पुणे येथे हलवण्यात आले होते. परंतु पुणे येथील संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ज्ञानेश्वर यास घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर शेवगाव येथील बडे मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये ज्ञानेश्वर याच्यावर उपचार चालू आहेत. हे नागरगोजे कुटुंबीय प्रचंड दहशती खाली असल्याचे दिसत आहे. तसेच कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणीही यावेळी ज्ञानेश्वरच्या आईने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here