Shrigonda : छत्तीसगड येथील १४२ परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यासाठी बस सोडल्या

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – आज रोजी श्रीगोंदा तालुक्यात अडकलेल्या छत्तिसगड येथील १४२ परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी श्रीगोंदा बसस्थानकातून दुपारी २.३० वाजता ५ एस.टी. बसेसमधून महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील देवरी या ठिकाणी त्यांच्या गावी पाठविण्यात आले.

यावेळी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे व सोशल डिस्टंशिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. सर्व परप्रांतीय मजूरांना जेवणाची फूड पॅकेटस व पाणी बॉटल देण्यात आली. यावेळी परप्रांतीय मजूरांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान पाहण्यास मिळाले.

याठिकाणी (श्रीगोंदा तहसीलदार) महेंद्र माळी, पोलिस अधिकारी,(तालुका आरोग्य अधिकारी) नितीन खामकर,(निवासी नायब)तहसिलदार योगिता ढोले, (श्रीगोंदा आगार व्यवस्थापक) प्रविण शिंदे ,(वाहतूक निरीक्षक) रोहित रोकडे ,पो.कॉ. अविनाश ढेरे, पो.कॉ. संतोष कोपनर, शंकर ढवळे , राजेंद्र साबळे, गणेश कोथिंबिरे, संदिप चौधरी सह महसूल व परिवहन विभागाचे कर्मचारी तसेच एस. टी. बस चालक अशोक कुदळे, राजेंद्र गोरे,बाजीराव चोरमले, साहेबराव शिंदे , दत्ता पवार, गजानन कोतकर, आबा उदमले, निलेश गोरे, राजेंद्र अब्दुले,अशोक साळवे इ.नियोजनासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here