Pune : कोरोनामुळे साखर उद्योग अडचणीत शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पुणे : कोरोना व्हायरसचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे. यामुळे साखर उद्योग डबघाईस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर उद्योगाला पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासोबतच साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारला 5 उपाय सुचवले आहेत. गेल्या काही दिवसात पवारांनी मोदींना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे.

लॉकडाऊनमुळे मोठ्या संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला केंद्र सरकारने मदत करावी. सरकारचा गेल्या दोन वर्षांत राहिलेला निधी लवकरात लवकर परत करावा. कारखान्यांच्या डिस्टिलरी या वेगळ व्यावसायिक युनिट गृहित धरून त्यांना बॅंकाकडून विशेष अर्थसाहाय्य उपलब्ध करुन द्यावं, असंही शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

शरद पवारांनी सुचवले हे उपाय…

2018-19 आणि 2019-20 पासून प्रलंबित असलेले निर्यात प्रोत्साहन भत्ते आणि बफर स्टॉक क्लिअरिंगच्या खर्चासाठी निधीची तरतूद.

साखरेचा किमान हमीभाव दर्जानुसार 3450 ते 3750 रुपयांच्या श्रेणीत वाढवा.

मागील दोन वर्षात गाळप केलेल्या ऊसाला सरासरी प्रतिटन 650 रुपये अनुदानाची तरतूद करावी.

मित्र समितीच्या शिफारशींच्या आधारे खेळत्या भांडवलाच्या थकबाकीचे अल्प मुदतीच्या कर्जात रुपांतरण आणि दोन वर्षांच्या अधिस्थगनासह किंवा व्याज सवलतीसह सर्व मुदतीच्या कर्जाचे दहा वर्षांसाठी रुपांतरण करा.

साखर कारखानदारांच्या डिस्टिलरीजना सामरिक व्यवसाय एकक म्हणून मानले जावे, केंद्र सरकारतर्फे सन 2018 मध्ये जाहीर केलेल्या व्याज सबवेशन कॅपेक्स योजने अंतर्गत मंजूर झालेल्या इथनॉल प्रकल्पांना स्टँड अलोन (एकल) तत्वावर बँकांनी वित्तपुरवठा करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here