प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणावरून दहा हजार रुपये किमतीच्या गावरान शेळी चोरी गेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी फिर्यादी संतोष श्रीरंग फटे हे आपल्या कुटूंबियासोबत शेती करून आपली उपजीविका भागवतात तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध धंदा करतात त्याच्याकडे 9 गाया3 शेळ्या या त्यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या असताना दि 13 मे च्या पहाटे 5 च्या सुमारास एक शेळी दाव्यासह गायब झाल्याचे लक्षात आल्यावर सुटली असेल असे वाटले.
याबाबत फिर्यादीने शेजारील लोकांकडे विचारणा केली असता त्यांनीही फिर्यादी बरोबर शोधाशोध केली असता त्यांना शेळी कोठेही आढळून आली नाही. त्यावेळेस फिर्यादी यांची खात्री पटली की आपली शेळी चोरीला गेली आहे. त्यावरून सकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघमारे हे करत आहेत.