हवामान खात्याची माहिती
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राज्यात पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. तसेच मान्सून मात्र 15 दिवस लांबणीवर पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढील चार दिवस मराठवाडा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह पाऊस पडेल.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून लांबणीवर पडणार असून केरळ मध्ये मान्सून पाच जून तर गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत मान्सून दाखल होईन. यामुळे आधीच कोरोना संकटामुळे हवालदिल झालेल्या बळीराजासमोर मान्सूनची चिंता उभी ठाकणार आहे.