Shevgaon : सामाजिक बांधिलकीचे धडे गिरवतायेत विद्यार्थी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – संपूर्ण जगाला धास्तीत पाडलेल्या कोरोना महामारीच्या या काळात शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या या काळात येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव महाविद्यालय मात्र अभ्यासाबरोबरच सामाजिक बांधिलकीची धडे गिरवत आहेत.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक यांनी स्वत: कापडी मास्क शिलाई करून गरजू लोकांना वाटत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कोरोना जनजागृती व आपत्ती व्यवस्थापन” या अभियानात सक्रिय सहभागी होऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील प्रत्येकी 10 कुटुंब दत्तक घेऊन त्या कुटूंब-सदस्यांना मार्गदर्शन व मोफत मास्क वाटप करत आहेत.

महाविद्यालय सेवा भावनेतून स्वखर्चाने बनवलेले कापडी मास्क व सॅनिटायझर शेवगाव परिसरातील पोलीस प्रशासन, पंचायत समितीतील आरोग्य सेवक, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी, फळ विक्रेते, वृद्धाश्रम ई. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाटप करत आहेत. संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयालायचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मिरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गोकुळ क्षीरसागर आणि मनोज टेकुले, हरिओम बेद्रे, ऋषिकेश चव्हाण, तृप्ती शेळके, असे एकूण 60 स्वयंसेवक विद्यार्थी कोरोना जनजागृती आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here