प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील रहिवासी जो हल्ली पुण्यात राहत आहेत. हा दिनांक १५ मे रोजी छुप्या पद्धतीने तालुक्यातील त्याच्या गावी आला. जिल्हा प्रशासनाचे जिल्हा बंदीचे आदेश असल्याने, त्याच्या नमूद कृत्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याने, त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून, राज्यातील सर्वाधिक रुग्णांची संख्या ही मुंबई व त्याच्या खालोखाल पुण्यामध्ये असल्याचे नमूद आहे. पुण्यामधील नागरिकांना इतरत्र प्रवासासाठी बंधन असताना व सर्व यंत्रणा लॉकडाऊन असताना हा इसम छुप्या पद्धतीने श्रीगोंद्यात आल्याने त्याला प्रशासनाने ताब्यात घेत दवाखान्यात भरती केले आहे. संक्रमित भागातून प्रवास करून जिल्हाधिकारी यांचे जिल्हाबंदीचे आदेश न जुमानता किंवा उल्लंघन करून हा इसम श्रीगोंदा तालुक्यातील त्याच्या गावी आल्याने आसपास चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुरंन आय कलम ४५९/२०२० भादवि कलम १८८,२६९,२७० सात रोग प्रतिबंधक कायदा 1897 चे अधिनियम कलम २,३,४ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचा जिल्हा बंदीचा आदेश असताना विनापरवाना पुणे ते श्रीगोंदा (त्याच्या गावी) छुप्या मार्गाने प्रवास करून, त्याच्या कृत्यामुळे इतरांच्या जीवितास घातक असलेला कोरूना हा संसर्गजन्य आजार पसरण्याचा संभव आहे. हे स्वतःला माहीत असून, सुद्धा बेकायदेशीरपणे, हायगईने व घातक कृत्य करून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
tinder app , tinder app https://tinderdatingsiteus.com/