प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – श्रीगोंदा तहसील कार्यालयाकडून परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी आत्तापर्यंत तब्बल 447 पास देण्यात आले असून या पासवरती अनेक कुटुंब मायदेशी परतले, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात येत आहे.
त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात पास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येताना दिसत आहेत. त्यांना आजपर्यंत तहसील कार्यालयाकडून आतापर्यंत तब्बल 447 पास देण्यात आले असून श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला आलेले परप्रांतीय मजूर वत्यांचे परिवार, असे एकूण मिळून हजारो कामगार मायदेशी परतले आहेत आणि त्यांनी सुटकेचा विश्वास टाकत त्यांनी श्रीगोंदा तहसीलदार तसेच तालुक्यातील सर्वच नागरिक यांना तुमच्यासारखे लोक आम्ही कुठेही पाहिले नाहीत तुम्ही लोक खरंच खूप चांगले आहात.
आम्हाला आजपर्यंत घरच्या सारखे जपले त्यामुळे तुमच्या तालुक्यातील लोकांचे अतोनात उपकार आम्ही कधीच विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया एका मजूर कामगाराने घरी मायदेशी गेल्यावर फोन करून पत्रकारांना दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना प्राधिकृत केले असल्यामुळे तहसीलदार यांना पास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अजूनही तालुक्यात काही ठिकाणी मजूर आहेत त्यांनाही आपल्या घरी जायचे आहे. त्यामुळे पासची मागणी होत राहील तरी मजुरांनी तात्काळ पास घेऊन जावेत, अशी माहिती श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.