अकोले – शेततळ्यातील लिकेज काढत असताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या पुतण्याला वाचवताना पुतण्यासह चुलत्याचाही पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे घडली.
याबाबत अकोले पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील भिमा शंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात रविवारी दुपारी लिकेज काढण्याचे काम सुरु असताना शेततळ्याच्या कागदावर शेवाळ असल्याने या शेवाळावरुन कार्तिक सुनिल गोर्डे (वय १९) या तरुणाचा पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात पडला त्याला पोहता येत नसल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याचे चुलते अनिल खंडु गोर्डे (वय ४५) यांनी पाण्यात उडी मारली.
माञ, पाण्याचा ठाव न लागल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. तात्कळ जवळील कुटुंबातील इतरांनी मृतदेह बाहेर काढून मयताचे भाऊ सुकदेव गोर्डे यांनी पोलिसांत खबर देताच पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पोहेकॅा बाबासाहेब भोसले, पो.ना.वलवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात आणून अकस्मात मृत्यूचा दाखल करण्यात आला आहे.