Lockdown 4.0 : चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत जाहीर; नियमावली जाहीर होण्याकडे लक्ष

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तिसरा लॉकडाऊन आज मध्यरात्री संपत आहे. मात्र कोरोनाचे सावट अद्यापही गडद आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवून 31 मे करण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन प्राधिकरणने याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रात राज्य सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात 31 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार चौथा लॉकडाऊन हा नव्या नियमांचा असणार आहे. काही माहितीनुसार या लॉकडाऊनमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, अद्याप केंद्र सरकारने कोणतीही नियमावली जाहीर केली नाही. आज रात्री उशिरा नवीन नियमावली जाहीर करण्यात येईन.

तर राज्य सरकारने केंद्राची नियमावली जाहीर झाल्यानंतर राज्याची नियमावली जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्व जनतेचे लक्ष केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाकडे लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here