प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
चौथ्या लॉकडाऊनसाठीची केंद्राची नियमावली जाहीर; आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या नियमावलीची
कोरोनाचे सावट पाहता देशात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र, या संबंधीची नियमावली गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. यावेळी अनेकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट अर्थात रेल्वे, देशांतर्गत विमान वाहतूक, व बससेवा सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, या सर्व सेवा बंदच राहणार आहेत. केवळा राज्या-राज्यांतील संवादानुसार आंतरराज्यीय बससेवा सुरू करण्याची अनुमती गृहमंत्रालयाने दिली आहे.
वाचा नियमावली –
- मेट्रो आणि रेल सेवा बंदच
- देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद
- शॉपिंग मॉल बंद
- धार्मिक स्थल बंद
- राज्यांमधील विचारविनिमयानुसार बस सेवा सुरू
- कंटेनममेंट झोन सोडून अंतरराज्यीय बस सेवा सुरू
- कंटेनमेंट झोनमध्ये बससेवा नाही
- ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षापेक्षा कमी बालकांनी घरातच रहावे
- संध्याकाळी 7 ते सकाळी 7 कर्फ्यू राहणार
- रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार राज्यांना
- आरोग्य सेवक एका राज्यातून दुस-या राज्यात ये-जा करू शकतात
- स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडू शकतात मात्र येथे प्रेक्षकांना अनुमती नसेल
- शाळा-कॉलेज बंद राहणार.
- हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार.
- थिएटर, शॉपिंग मॉल, जिमही बंदच राहणार.
- धार्मिक, सामाजिक कार्यंक्रमांना परवानगी नाही.
- सरकारी कार्यालये व कॅन्टीन सुरू राहणार