प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक या गावांमधील जमिनीत चर खोदत असताना होत असलेल्या ऊस पिकांचे नुकसान विचारणा केली असता दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शेवगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.
शिवाजी खरात (वय वर्षे 62) रा. आव्हाने बुद्रुक, यांनी या विषयी तक्रार दाखल केली.
शेतामध्ये जेसीबीच्या सहाय्याने खोदून ऊसाच्या पिकाचे नुकसान केले असता संबंधित जेसीबी चालकास चर का खोदता, अशी विचारणा केली. यावेळी कमल बाई व त्यांच्या मुलाला कोळगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. 8 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदर तक्रार ही 15 मे रोजी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वी कलम 447, 427, 504, 506, 34 सह अ . जा .ज. अत्या. प्र . क्र १९८९चे कलम 3 (१) जीएस डब्ल्यू (3) (2) व्ही ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हे शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे करत आहेत.