प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही अंतर्गत संपूर्ण तालुक्यातील रस्ते विभागले गेलेले आहेत. न त्यापैकी बहुतांश रस्ते खराब होऊन चाळण झालेले आहेत. एखादा चांगला रस्ता शोधूनही मिळताना दिसत नाही. एकूणच तालुक्यातील जिल्हा प्रमुख मार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते अशा लहान मोठे सर्वच रस्त्यांची दुरावस्था लागलेली आहे.

boAt Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth V5.0, Immersive Audio, Up to 14H Total Playback, Instant Voice Assistant, Easy Access Controls with Mic and Dual Tone Ergonomic Design(Active Black)
₹ 1,299.00 (as of January 26, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)OnePlus Bullets Wireless Z in-Ear Bluetooth Earphones with Mic (Black)
₹ 1,999.00 (as of January 26, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे तीर्थक्षेत्र सिद्धिविनायकाच्या नावाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये नावारुपाला आलेले आहे.या ठिकाणी जाण्यासाठी श्रीगोंदा तालुकयातील घोडेगाव आढळगाव तसेच चांडगाव शेडगाव परिसरातून जावे लागत या यानिमित्ताने विविध विभागाचे मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या दर्शनासाठी येण्या-जाण्याचे सत्र सतत चालू असते. मात्र त्या मानाने तालुक्यातील सर्व रस्ते चकाचक असणे गरजेचे असताना झालेले नाहीत.
महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्र शासनाने खड्डामुक्त राज्याची घोषणा केलेली होती. त्या दरम्यान संपूर्ण खड्डे भरण्यात आले होते. या घटनेला काही महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला नसतानाही सदर रस्त्यावरील खड्डे पुन्हा निर्माण झाले आहेत. त्यामध्ये श्रीगोंदा ते घोडेगाव, हिरडगाव फाटा ते शेडगाव फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली पाहण्यास मिळत आहे. या मार्गावरील खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्याची चाळणी झालेली आहे. संपूर्ण रस्ता खराब असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेले रस्ते आहेत कि हरवले आहेत हे सांगता येत नाही अशीच अवस्था पाहण्यास मिळत आहे.
संपूर्ण चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना जीव मुठीत धरुन चालवावे लागत आहे. त्यामधूनही दररोज एखादा लहान मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावे लागले आहे. तर काहीजणांना अपंगत्व आलेले आहे. तालुक्यातील सर्वच रस्त्याची वाट लागलेली असताना अधिकारी व पदाधिकारी संवेदनशील नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खराब रस्त्याचा मोठा फटका तालुक्याच्या दळणवळणाबरोबरच इतर वाहतूकप्रसंगी बसत आहे.