Beed: नगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त महिलेचा बीडमध्ये मृत्यू!

0

मृत महिलेचे वय 65 वर्षे,

कुटुंबासमवेत मुंबईहून आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे प्रवास;

कुटुंबातील सात जण कोरोनाबधित

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
बीड/शिरुरकासार :आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे मुंबईहुन आलेल्या व मुळ नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील असलेल्या एका 65 वर्षीय महिलेचा आज पहाटे म्रुत्यु झाल्याने खळबळ उडाली.
पाच दिवसापूर्वी मुंबईहून आलेले हे सात जनांचे कुटुंब बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या सांगवी (पाटण) या ठिकाणी सुनाकडे आले होते.

कालच त्या सात जनांचा कोरोना तपासणी अहवाल पाँझिटीव आला होता. आज पहाटे यातील महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांमध्ये या कोरोनाग्रस्त कुटुंबाचा ज्या ज्या लोकांशी संपर्क आला, त्यांची माहिती घेऊन तपासणी करण्याचे काम प्रशासनाने वेगाने सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here