Ahmednagar : नगर शहरात वळीवाचा पाऊस; जिल्हा मात्र कोरडाच

0

प्रतिनिधी | राष्ट्र  सह्याद्री

अहमदनगर – नगर शहरात सोसाट्याचा वारा सुटून आज सोमवारी सायंकाळी पाचनंतर मुसळधार पाऊस पडला. काल रविवारी देखील असाच वळीवाचा पाऊस झाला. सलग दोन दिवस आलेल्या या पावसाने शहरात उन्हाच्या झळा मात्र कमी झाल्या. तर जिल्ह्यात मात्र अजूनही कडक ऊन असून जिल्ह्यात कोठेही पाऊस झाला नाही.

श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा आदी भागात काही वेळासाठी ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडला नाही. त्यामुळे नगर शहरात पाऊस आणि जिल्हा मात्र कोरडाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here