Newasa : लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच सोनईमध्ये तुफान गर्दी; शासकीय नियमाचा फज्जा (पाहा व्हिडिओ)

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सोनई – देशात लॉकडाऊन चार लागू झाला असून काही भागात जीवनावश्यक वस्तूंसह गरजेची दुकानं देखील सुरु करण्यात आली. असे असले तरी तोंडावर मास्क, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे अनावश्यक गर्दी टाळणे अशा काहीअटी घालण्यात आल्या आहेत. पण सोनईमध्ये मात्र या कोणत्याच नियमाचे पालन होताना दिसत नाही. 

ना दुकानदार नियम पाळत आहे, ना जनता सोनई येथे महावीर मार्ग शिवाजी रोड येथे ठोक किराणा व कापडाच्या दुकान आहेत. येथे तर जत्राच भरली, असे वातावरण असून सोनई ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व कर्मचारी मास्क न घालणा-या मोटरसायकलस्वाराकडून दोनशे रुपये दंड वसूल करत आहेत. पण ज्या दुकानामुळे गर्दी होते. त्यांना काय दंड करणार, असा प्रश्न पडतो. सोनई परीसरात अजून एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. ही निश्चितच समाधानकारक बाब होय. पण काळजी मात्र नक्कीच घेतली पाहिजे. आपल्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण परीसराला होऊ शकते.

याचे भान व्यापारी वर्गाने व जनतेने ठेवले पाहिजे याकडे थोड गंभीरपणे पाहिले पाहिजे. पण ते अजिबात होत
नाही. नेवासा तालुक्यातील सोनईची बाजारपेठ सगळयात मोठी आहे. त्यामुळे गर्दी होणारच पण अजून काही दिवसतरी नियम पाळणे गरजेचे आहे. पुढच्या आठवड्यात रमजानचा सण आला आहे. लग्नसराई आहे या सर्व गोष्टींचा विचार करून दुकानदारांनीच गि-हाईक करताना नियम पाळणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here