1)इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय 35, 2) चंदनसावरगाव ता केज – वय 23 मुंबईहून आला, 3) काळेगाव ता केज – वय 29 मुंबईहून आला, 4) ठाणे येथून आलेले दोघे – वय 22 व 44 (मोमीनपुरा, बीड), 5) ठाणे येथून आलेले – वय 16, 14 व 36 (रा सावतामाळी चौक, बीड)
प्रतिनिधी | शिरूरकासार | राष्ट्र सह्याद्री
बीड – 17 मे पर्यंत कोरोना रुग्णात निरंक राहणा-या बीड जिल्ह्यात आता हळूहळू रुग्ण संख्या वाढत असून हे बीड साठी धक्कादायक आहे. आजवर बीड जिल्ह्यात सापडलेले सर्वच्या सर्व कोरोनाबाधित परजिल्ह्यातून आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा चार दिवसातच 18 वर गेला त्यातच एका महिलेचा म्रुत्यू झाला. त्यामुळे जनतेमध्ये घबराट पसरली आहे. जिल्ह्यात आणखी 8 जण पॉझिटिव आले आहे.
कोरोनाचा शिरकाव आष्टी पाठोपाठ आता गेवराई, माजलगाव , बीड ,आणि केज तालुक्यातही झाल्याचे दिसु लागले आहे. 17 मे रविवार रोजी0चा असल्याने प्रशासन काही प्रमाणात शिथिलता देईल अशीआपेक्षा असताना आष्टी तालुक्यात मुंबईवरून रविवारी आलेले8 रूग्ण सापडल्याने या आपेक्षेवर पाणी फिरले. सोमवार, 2 मंगळवारी बीड जिल्ह्यातून ६६ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 8 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असून ५५ जणांचे निगेटिव्ह आले.
आष्टी, गेवराई, माजलगाव बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने जिल्ह्यात हातपाय पसरू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले असून कोरोना रुग्ण सापलेल्या पाच तालुक्यात गावांचा परिसर प्रशासानाने शिल केला व या काही कालावधीसाठी संचारबंदी जाहीर करून पोलिसांचा कडक पहारा दिसत आहे. एकूणच18 रूग्णांपैकी एक महिला दगवली 7 रूग्ण त्यांच्या ईच्छेनुसार पुण्याला गेली सध्या दहा रुग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत दिवसेंदिवस कोरोना हातपाय पसरु लागल्यामुळे संपूर्ण जिल्हा भयभीत झालाआहे.