Akole : अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांचे अपघाती निधन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अकोले – अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांचे आज नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना निधन झाले.

केळी ओतूर येथे राहत्या घरी विहिरीचे काम चालू असताना दि १७ मे रोजी विहिरीत पडले होते. त्यांना तातडीने नाशिक येथे शताब्धी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्षे होते.त्यांच्या मागे पत्नी,2मुले, १मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी आमदार वैभवराव पिचड हे नाशिकला गेले होते.

कै.दत्तात्रय बो-हाडे हे सातेवाडी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. ते माजी मंञी मधुकरराव पिचड, माजी आ.वैभवराव पिचड, याचे समर्थक व भाजपाचे पं.स.सदस्य असल्याने काही महिन्यापूर्वीच त्यांची अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवड करण्यात आली होती.त्याच्या निधनाची वार्ता समजल्यावर तालुक्यात शोककळा पसरली असून परिसरात सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री मधुकरराव पिचड, मा.आ.वैभवराव पिचड, जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here