‘साईसेवा’ मंडळाचा अनोखा उपक्रम
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोरोनाचा संपूर्ण जगातून लवकर नायनाट व्हावा यासाठी देवळाली प्रवरातील प्रत्येक घराघरात स्तवन मंजिरी व साईचरिञ ग्रंथातील अध्याय वाचन करुन साईबाबांना साकडे घालण्यात आले आहे. प्रत्येक घरातील सहकुटुंबानी सर्व नियमांचे पालन करुन अध्याय वाचन केले जात आहे. देवळाली प्रवरा येथील साईसेवा’ मंडळाचा अनोखा उपक्रम योजला असून भाविकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड प्रशांत मुसमाडे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अॅड मुसमाडे म्हणाले की, साई सेवा मंडळाच्या वतीने देवळाली प्रवरा शहरात हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, महसूल, स्वच्छता कर्मचारी, पञकार अहोराञ झटत आहे. त्यांना बळ मिळावे तसेच जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना साकडे घालण्यात आले.
पहिले पारायण गुरवार दि.14 मे रोजी सकाळी 7 ते 12 या वेळेत देवळाली प्रवरा परिसरातील प्रत्येक घराघरात मंगलाचरण, साईस्त वनमंजरी आदी अध्याय वाचकांनी वाचन करायचे आहे. 53 वाचकांचे गट तयार करुन सोडत पद्धतीने निघालेल्या नावाला भाविकाने त्या अध्यायचे वाचन करायचे आहे. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पारायणाचा दुसरा टप्पा रविवार दि.17 मे रोजी पूर्ण करण्यात आला आहे. तिसरा टप्पा गुरवार दि.21 मे रोजी, चौथा टप्पा रविवार दि.24 मे रोजी टप्प्या टप्प्यात साईचरिञाचे वाचन करण्यात येणार आहे. गुरवार व रविवार वाचकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन साईसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
साई प्रतिष्ठानने लाखो भाविकांना जोडले
साई प्रतिष्ठानने गेल्या सहा वर्षापासून साई पारायण व कथा, किर्तन महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे देवळाली प्रवरासह तालुका, जिल्ह्यातील भाविक जोडले गेले आहे. सध्या देवळाली प्रवरात अनोख्या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साईचरिञ वाचनातून कोरोनो घालविण्यासाठी हा उपक्रम राज्यभर पोहचवावा, असा मानस व्यक्त केला.
– अॅड प्रशांत मुसमाडे, साईसेवा मंडळ
असे करावे आध्याय वाचन
साईसेवा मंडळाने दिलेल्या टप्प्या नुसार व गुरवार व रविवार तारखांनुसार साईभक्तांनी सकाळी 7 ते 12 या वेळेत श्री साईबाबांच्या प्रतिमेपुढे या अनोख्या उपक्रमाला सुरवात करावी.प्रथमः स्तवन मंजीरीचे वाचन त्यानंतर पहिल्या अध्यायात साईंनी शिर्डीतील महामारी घालविल्याचा उल्लेख आहे.त्यामुळे कोरोनाची माहामारी जाण्यासाठी प्रत्येक गुरवार व रविवार पहिल्या अध्यायाचे वाचन करुन सोडत पद्धतीने मिळालेल्या अध्यायाचे वाचन करावे.शेवटी बाबांची आरती करुन कोरोनामुक्तीसाठी साईना प्रार्थना करावी.
– अनिता उंडे, साईचरिञ वाचक
जय साई