ढोरजळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत मोडकळीस आली होती. ही इमारत ठिकठिकाणी खचली होती. या नवीन इमारतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्याकडे नवीन इमारतीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. मारूतरावजी घुले यांचे ढोरजळगांवकरांवर पूर्वीपासून प्रेम आहे. त्यामुळे राजश्री घुले यांनी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परीषदेच्या वतीने ढोरजळगांव प्राथमिक आरोग्य केद्रांच्या नवीन इमारत बांधकामासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. आज हे काम पूर्णत्वास असून आरोग्य सुविधायुक्त सुंदर असे प्राथमिक आरोग्य केद्रांची इमारत राजश्री घुले यांच्या प्रयत्नामुळे उभी राहिली आहे.
जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनात आरोग्यसमस्यांमध्ये सध्या भरीव वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज खाजगी दवाखान्यात उपचारासाठी लाखो रूपये खर्च येत असताना सर्वसामान्य नागरिकांना आता प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा रूग्णालय याठिकाणी चांगली वैद्यकीय सेवा देली जात आहे. ढोरजळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन इमारत दिल्याबद्दल जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या कामाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.