Beed : जिल्ह्यात पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव; आकडा 22 वर; 13 जणांचे अहवाल येण्याची प्रतीक्षा

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली असून प्रत्येक नागरिक आपल्या सुरक्षिततेची काळजी घेताना दिसत आहे.

काल दि20 रोजी  8 जणांचे अहवाल पॉझिटिव आल्यानंतर आज पुन्हा 114 पैकी 100 अहवालात पाटोदा तालुक्यातील वाहली चिखली या गावात दोन पॉझिटिव आले. तर पाटोदा शहरात एक तसेच वडवणी तालुक्यात एक असे चार कोरोना पॉझिटिव आल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने वडवणी शहर, पाटोदा शहर तसेच वाहली चिखलीचा परिसर सिल केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढच चालल्याने भीतीचे वातावरण पसरले असून लातुरला तपासणीसाठी पाठवलेल्या पैकी राहिलेले 14 अहवालात काय होईल याची प्रतीक्षा प्रशासनासह जनतेला आहे. निरंक असलेला जिल्हा 22 वर गेल्याने  जनता मात्र पूर्णतः घाबरून गेली आहे.

पाठविलेले स्वॅब – 114
पॉजिटिव्ह अहवाल – 4
निगेटिव्ह अहवाल – 90
प्रलंबित अहवाल – 13
Inconclusive – 6
Reject – 1
वाहली ता. पाटोदा – 2 (वय 60 आणि 27 – दोन्ही महिला)
पाटोदा – 1 (वय 73 पुरुष)
वडवणी  – 1 (वय 67 पुरुष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here