Shrirampur : माळवाडगांव येथे विलगीकरण कक्षातील युवकांकडून स्वच्छता अभियान

0

प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री | संदीप आसने
 

माळवाडगांव – विलगीकरण कक्षात ठेवलेल्या युवकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात स्वच्छता अभियान राबविले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील वीटभट्टीवर कामासाठी गेलेल्या दहा कुटुंबातील युवकांना माळवाडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विलगीकरण कक्षात काॅरंटाईन करण्यात आले आहे.

माळवाडगावचे सरपंच बाबासाहेब चिडे, ग्रामसेविका प्रियंका शिंदे, पोलीस पाटील संजय अदिक, तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत विलगीकरण कक्षात काॅरंटाईन असलेल्या अनिल खैरे, सुनील खैरे, रावसाहेब मोरे, खंडू पवार, राजेंद्र मोरे, एकनाथ उमाप, बाळू मोरे, प्रवीण अहिरे, दत्तू मोरे, राजेंद्र गायकवाड, अर्जुन मोरे, विजू मोरे या तरुणांनी पुढाकार घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत माळवाडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर स्वच्छ केला. तसेच शाळेतील झाडांची फळे स्वच्छ करून झाडांना पाणी दिले. काॅरंटाईन काळात मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून समाजाला दिशा देण्याचे काम या युवकांनी केले आहे.

या युवकांच्या चांगल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून माळवाडगांव सोसायटीचे चेअरमन गिरीधर आसने, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कचेश्वर जठार, तलाठी अरुण हिवाळे, पो.पाटील मधुकर बनसोडे यांच्यासह ग्रामस्थांनी या युवकांच्या चांगल्या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी पोलीस पाटील संजय आदिक, अरुण हुरुळे, बबन आसने, पञकार विठ्ठलराव आसने, पञकार संदिप आसने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here