Shrigonda : कोळगावात लाखो रुपयांची दारु जप्त

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील कोळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळगाव येथिल बियर शॉपीवर छापा टाकून छापा टाकून अडीच लाखाहून अधिक रकमेची देशी-विदेशी दारु जप्त केली. या बियर शॉपीमधून खुलेआम दारु विक्री सूरु होती. मात्र, तरीही स्थानिक पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

कोळगाव येथे नगर-दौंड महामार्गावर बियर शॉपी आहे. बियर शॉपी चालक बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (२२) दुपारी या बियर शॉपीवर छापा टाकला. त्यावेळी या शॉपीमध्ये देशी-विदेशी दारु आढळून आली. त्याच बरोबर काही साठा घरातून जप्त करण्यात आला.

या कारर्वाइत अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संतोष रोडे, रविंद्र कर्डिले ,सचिन अडबल, रविंद्र घूंगाटे, प्रकाश वाघ,सन्दीप चव्हाण, विनोद मासाळकर, रोहित मिसाळ, रोहिदास नवघिरे, कमलेश पाथ्रुड,सागर सुलाने, सचिन कोळेकर, महिला पोलिस कर्मचारी सोनाली साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here