प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर – तालुक्यातील नाऊर येथिल पत्रकार, लेखक, चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेता कृष्णा निकम नाऊरकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता प्राप्त नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट कामगार आघाडीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विष्णू घोलप यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रानूसार अहमदनगर जिल्ह्यातील चित्रपट कामगार, कलावंत समस्या विविध प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. सोंगाड्या, बन्या बापू चित्रपट दिग्दर्शक स्व.गोविंद कुलकर्णी यांच्याबरोबर असंच पाहिजे नवं नवं या चित्रपटात अंकुश चौधरी बरोबर सहाय्यक अभिनेता म्हणून रूपेरी पडद्यावर पदार्पण कृष्णा निकम नाऊरकर यांनी केले.
सप्तरंग, आधार आदी नाट्य संस्थाच्या माध्यमातून राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार लहू कानडे, बाबासाहेब कुटे यांच्या बरोबर जिल्ह्यात राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम केले आहे. तसेच दैनिक सार्वमत, लोकमत, पुढारी, पुण्यनगरी श्रीरामपूर नगर जिल्ह्यात स्तरावर, उपसंपादक लेखक पत्रकार म्हणून काम केले आहे. कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे ही मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे.
गेल्या दहा-बारा वर्षे चित्रपट कामगार क्षेत्रात विविध विषयांवर काम करीत असलेल्याने जिल्हा अध्यक्ष पदची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास जिल्ह्यातील चित्रपट कामगार कलावंत पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे. यानिवडीबद्ल त्यांचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.