Rahuri : दुकानात गर्दी, गुन्हा दाखल

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील गौरव कलेक्शन या कापड दुकानात खरेदी 25 ते 30 एकञ मिळाल्याने दुकानाराने सामाजिक अंतर ठेवले नाही. दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर पायल कलेक्शन आठ दिवसाकरीता सिल करण्यात आले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली नगर पालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील गौरव कलेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी कपडे खरेदी करण्यासाठी एकाच वेळेस 25 ते 30 ग्राहकांना प्रवेश दिला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. सामाजिक अंतर ठेवले नाही. यावरुन नगर पालिकेचे प्रशासन अधिकारी सुदर्शन जळक यांनी कलम 188 नुसार राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शनिवारी सकाळी उपजिल्हाधिकारी आशिमा मित्तल नगर- मनमाड मार्गावरून शिर्डी कडे जात असताना सदर दुकानात गर्दी असल्याचे लक्षात येता दुकान बंद करण्यास सांगितले. पुढील दंडात्मक कारवाईसाठी देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी अजित निकत यांना कळविले. निकत यांनी आठ दिवसासाठी पायल कलेक्शन सिल केले.

नगर पालिका आपल्या सेवेसाठी आहे. कोणत्याही दुकानदारास दंड आकारणे व कारवाई करणे योग्य वाटत नाही. नागरीकांनी व दुकानदारांनी सामाजिक अंतर ठेवून दुकानदारांनी ग्राहकास सेवा पुरवावी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग होणार नाही याची काळजी दुकानदारांनी घेतली पाहिजे.

प्रशासनाने जरी दुकान चालविण्याची परवानगी दिली तरी सोशल डिस्टसिंग अंमलात आणणे गरजेचे आहे. दुकानांच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझर ठेवावे. मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोणी ग्राहक मास्क वापरत नसेल तर त्याबाबत सूचना द्याव्यात. 
– अजित निकत, मुख्याधिकारी दे.प्रवरा नगर पालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here