प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – अवैधरित्या देशी – विदेशी दारुच्या साठयावर छापा टाकुण २ लाख ४८ हजार ४७८ रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या सरकारी कामात अडथळा आणणा-या पती-पत्नीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे ही कारवाई करण्यात आली.
दीपक आबासाहेब नलगे (वय -४२ रा.कोळगांव तालुका श्रीगोंदा), संचिता दीपक नलगे (वय – ३५ रा.कोळगांव तालुका श्रीगोंदा),
सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि २२) पोलीस निरीक्षक दिलीप पवार, (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना गोपनिय माहीती मिळाली कि, आरोपी दीपक याचे निखील बिअर शॉप आहे. त्याच्याकडे फक्त बिअर विक्रीचा परवाना असताना, त्यामध्ये तो देशी व विदेशी दारुची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करतो. तसेच, त्याच्या राहत्या घरी भापकरवाडी रोड कोळगांव येथे मोठया प्रमाणात देशी – विदेशी दारुचा साठा करुन, सदर दारुची विक्री करत आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पो.नि. / दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ / विजयकुमार वेठेकर, पोना / रवींद्र कर्डीले, पोना / संतोष लोढे , पोना / सचिन आडबल , पोकॉ / प्रकाश वाघ, पोकॉ / संदिप दरंदले, रविंद्र चुंगासे, रोहीदास नवगीरे, संदीप चव्हाण, कमलेश पाथरुड, विनोद मासाळकर, रोहीत मिसाळ, सागर सुलाने, मपोकॉ / सोनाली साठे, सचिन कोळेकर संभाजी कोतकर, शिवाजी ढाकणे हे माहितीनुसार खात्री करुन कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून कारवाई करिता सरकारी व खाजगी वाहनाने रवाना झाले.
या पथकातील नमूद कर्मचारी यांनी सदर छाप्याकामी बेलवंडी पो. स्टे. चे पोसई / प्रकाश बोराडे, पोना / रावसाहेब शिंदे, पोकॉ / दादासाहेब क्षीरसागर, मपोकॉ / सुरेखा वलवे, मपोकॉ / विदया धावडे व दोन पंच यांना सोबत घेऊन निखील बिअर शॉपी येथे जाऊन खात्री केली. तर, सदर ठिकाणी एक इसम निखील बिअर शॉपीमध्ये विदेशी दारुची विक्री करताना त्यांना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने दिपक आबासाहेब नलगे असे नाव सांगीतले. यावेळेस ४९ हजार ५३६ रुपये किंमतीची देशी व विदेशी दारु त्याचे बिअर शॉपीमधून पंचासमक्ष पोलिसांनी जप्त केली.
त्यानंतर बातमीतील नमूद दुसरे ठिकाणी त्याचे राहते घरी भापकरवाडी रोड कोळगांव येथे खात्री करण्यासाठी पोलीस गेले असता, तेथे असलेल्या एका महिलेने पथकास घरात जाण्यास मज्जाव करुन सदर सरकारी कारवाईमध्ये अडथळा आणला. सोबत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी हीस शिवीगाळ धक्काबुक्की केली. यावेळी पत्नी संचिता हीस पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचा समक्ष घराची झडती घेतली असता, सदर ठिकाणी १ लाख ९८ हजार ९४२ रुपये किंमतीची देशी – विदेशी दारुचा साठा मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत एकूण २ लाख ४८ हजार ४७८ रुपये किंमतीची देशी विदेशी दारु अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने नमूद आरोपी यांना जप्त मुद्देमालासह बेलवंडी पो. स्टे. येथे हजर करुन पोकॉ / रवींद्र तुकाराम डुंगासे , नेम- स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजी.नं.आय १७७/२०२० भादवि कलम ३५३,५०४,५०६ , सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई अखिलेश कुमार सिंह (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), सागर पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर), संजय सातव, (उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत भाग कर्जत) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.