प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
रेड झोनमधील विमान वाहतूक सुरू करणे धोकादायकच आहे, असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. उद्या सोमवार (दि.25) पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचे नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार विमानतळांवर तयारी करण्यात आली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख रेड झोनमधील विमान वाहतूक सुरू करणे हे धोकादायक असून ग्रीन झोनमधील व्यक्तींना रेड झोन मध्ये आणणे म्हणजे प्रादुर्भाव वाढवणेच होय असे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
मुंबई विमानतळावरून उद्यापासून वाहतूक सुरू ?
तर मुंबई विमानतळावरून उद्यापासून वाहतूक सुरू होईल का नाही याबाबतही शंकाच आहे. कारण मुंबई विमानतळ प्रशासनाला अद्याप कोणत्याही प्रकारच्या तयारीचे आदेश देण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्यापासून मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरू होण्याच्या शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.