Shrigonda : टाकळी कडेवळीत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी जोरदार होताना दिसत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी अनेक ठिकाणी भुरट्या चोऱ्या केल्या असून यामध्ये एक जणांचा बोकुड तर परिसरातील हॉटेलमध्ये उचकापाचक करून धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच परिसरातील अनेक ठिकाणी कुलूप तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून नागरिकांच्या सजग ते मुळे चोर त्यांचा डाव हाणून पडला आहे. मात्र, अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोऱ्यांमुळे टाकळी कडेवळीत परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी टाकळी कडेवळीत परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here