कोरोनापासून बचाव करण्यासाठी “आशा स्वयंसेविकां “फेससिल्ड”

0

कडा । प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी ग्राऊंडवर काम करणा-या आशा स्वयंसेविकांना आरोग्य विभागाकडून संरक्षणार्थ “फेससिल्ड” चे उशिरा का होईना वाटप करण्यात आले आहे.

कोरोना महामारीचा मागील दोन महिन्यांपासून संपुर्ण राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. त्यामुळे उदभवलेली जीवघेणी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग महत्वाची भूमिका बजावत आहे. कोरोनाच्या महासंकटात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक यांच्यासह आशा स्वंयसेविकांचे योगदान देखील महत्वाचे असून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आशा स्वंयसेविका स्वत:चा जीव धोक्यात घालून ग्राऊंडवर काम करीत आहेत.

कोरोनाच्या विषाणू संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी सर्व आशा स्वयंसेविकांना आरोग्य विभागाकडून “फेससिल्ड” चे आरोग्य विभागाकडून नुकतेच वाटप करण्यात आले आहे. चक्क दोन महिन्यानंतर आशांना “फेससिल्ड” देणे म्हणजे शासन, प्रशासनाला उशीरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल.

“फेससिल्ड” म्हणजे वराती मागून घोडे ?

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आशा स्वयंसेविका स्वत:चा जीव धोक्यात घालून संरक्षणाची साधने नसताना आतापर्यंत तुटपुंजा मानधनावर काम करीत आहेत. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना एवढ्या उशीरा देण्यात आलेले “फेससिल्ड” म्हणजे “वराती मागून घोडे” म्हटले तर वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here