Analysis: !!भास्करायण :५!!
उच्च्पदी थोरही बिघडे!!

0

Rashtra Sahyadri Special
“””””””””””*“””””””””””
गेल्या काही वर्षांत आपल्या राजकीय नेत्यांना काय झालेय, हेच कळत नाही. याला घटनात्मक पदावर बसलेली व्यक्तीही आता अपवाद राहिलेली नाही. आपण घटनात्मक पदावर असून संविधान रक्षण आणि गोपनियतेची शपथ घेतलिय, याचाच विसर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींच्या बाबत घडत आहे. ‘उचलली जिभ लावली टाळूला’ नुसार उच्च पदस्थ नेते असंवैधानि वक्तव्ये करित आहेत. खरे तर ही संविधान व लोकशाहिची विटंबना आहे.


आपल्या राज्यकर्यांना संविधानच ठाऊक आहे की नाही, असा प्रश्न फडतो. आता उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचं आत्ताचंं वक्तव्य आणि त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले प्रत्युत्तर घ्या, म्हणजे संविधानाचे कसे अवमूल्यन होत आहे, ते कळेल.

“यापुढे उत्तर प्रदेशातील मजूर हवे असतील तर,आमची(?) परवानगी घ्यावी”इति आदिनाथ योगी! तर “महाराष्ट्रात कामगारांना यायचे असेल तर,आमची(?) व सरकारची परवानगी घ्यावी. तसेच परप्रांतीय कामगारांची राज्य सरकारने नोंदणी करावी. इतकेच नव्हे तर, त्यांना फक्त उत्तर प्रदेशातच मतदानाचा हक्क द्वाया!”असे राज ठाकरेंचे प्रत्युत्तर.


वरवर ही वक्तव्ये टाळ्या घेणारी व अस्मिता जागविणारी वाटतील. पण या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यात स्वहिताचे मतलबी राजकारण दडलेय.खरेतर कोरोनाच्या महासंकटात माणूसकी दाखवायचे सोडून, आपल्या निर्दयी व संवेदनशून्य राजकारण्यांनी स्थलांतरीतांच्या वेदनेचा वापर राजकारणासाठी करावा,यापरता दैवदुर्विलास नाही.
हे दोघेही मोठे व शिक्षित नेते आहेत. पैकी योगी हे तर घटनात्मक पदावर आहेत.त्यामुळे तर त्यांनी या पदाला शोभेल असे वक्तव्य करणे व संविधानानुसारच वागणे अपेक्षित आहे. संकटकाळी नेते हेच जनतेचे आधार असतात. राजकारण बाजूला ठेवून, संकटसमयी धावून जायचं असतं, असे आपली उदात्त भारतिय संस्कृती सांगते. उठसूठ भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारांचे प्रत्यक्ष वागणे माञ असंस्कृत व पदाला न शोभणारे असते.
आपल्या संविधानात नागारिकांच्या मूलभूत हक्कांना प्राधान्य दिले असून, ते राज्यकर्त्यांना संकुचित करता येत नाहीत.संविधानाच्या भाग तिन “स्वातंञ्याचा हक्क” प्रकरणातील कलम१९(घ)”भारताच्या राज्यक्षेञात म्हणजेच देशात कोठेही सर्वञ मुक्तपणे संचार करणेचा अधिकार आहे.”तर कलम१९(ड)अन्वये देशातील कोणत्याही राज्यात राहाण्याचा व स्थायिक होण्याचा हक्क आहे.”त्याचप्रमाणे कलम १९(छ)”देशात कोणताही व्यवसाय,धंदा,व्यापार करण्याचा हक्क असेल” असे नमूद केले आहे.

आता संविधानात्मक तरतूदी बघितल्या आणि नेत्यांचे वक्तव्य बाघितले, तर दोन्ही नेते संविधानाचे सरळसरळ उल्लंघन करीत आहेत. आपण बोलतो ते करण्यास संविधान परवानगी देत नाही, हे या नेत्यांना ठाऊक आहे. इतके असूनही नेते अशी वक्तव्ये करतात, यामागे राजकारण व सहज लोकप्रियतेचा हेतू आहे. दोघा नेत्यांचा हा हेतू कदाचित साध्यही होईल. पण यामुळे जो पायंडा पडेल, तो देशाच्या सार्वभौमतेला तडा देणारा व प्रांतियवाद ठळक करणारा ठरेल, असा इशारा यानिमित्ताने द्यावासा वाटतो.

आता योगी आणि राज यांच्या वक्तव्यांचा मतितार्थ व त्यात दडलेले राजकारण शोधू. योगी हे विशिष्ट कडव्या विचारसरणीत घडलेले आहेत. या विचारसरणीला देशभक्तिचा मुलामा असला तरी, या मुलाम्याआड धार्मिक कट्टरता दडलेली आहे.हा हेतू योगींनी कधीही लपवून ठेवलेला नाही. आता वेगवेगळ्या राज्यातील जे स्थलांतरीत मजूर उत्तरप्रदेशात जात आहेत, त्यात बहुतांश विशिष्ट घटक आहेत म्हणून त्यांना मज्जाव केला जात आहे. विशिष्ट मजुरांना रोकले नाही, तर आपले प्रतिमाभंजन होईल, हे धूर्तपणे जाणून योगींनी वर नमूद वक्तव्य केले आहे.

राज ठाकरेंचा योगींवर पलटवार करण्यामागेही राजकीय धूर्तपणा आहे. कोरोना निमित्ताने रोजगारिचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. महाराष्ट्रातून लाखोंचे होणारे स्थलांतरीतांचे लोंढे राज्यातील बेरोजगार तरुणाईच्या अंगावर येत आहेत. या अस्वस्थ तरुणाईला आपलेसे करण्यासाठी राज यांनी अचूक टायमिंग साधले आहे. राज यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद राजविरोधकांना करता येणार नाही, हे दुसरे राजकीय वास्तव्य आहे. पण मराठी माणसेही परप्रांतात रोजगारी करतात. त्यांच्या बाबतीत तेथील राज्यकर्त्यांनी अशीच तिटकाराची भुमिका घेतली तर, याप्रश्नाचे राज यांचेकडे काय उत्तर आहे?

तर असे नेते त्यांची वक्तव्ये व त्यात दडलेला राजकीय मतलब!दोन्ही नेते जे बोलले, ते कृतीत येण्यात संविधान व कायद्यांचा अडसर आहे, हे या नेत्यांना ठाऊक आहे. वास्तविक कोरोनाच्या महासंकटात प्रांतवाद न करता एकमेकाला सहकार्य करणे, हा खरा धर्म आहे. तो न पाळता स्थलांतरिताच्या असहायतेचे राजकारण करणे, हे “उच्चपदी थोरही बिघडे “या उक्तीची प्रचिती देणारा आहे!

भास्कर खंडागळे ,बेलापूर
(९८९०८४५५५१ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here