Beed : शहर व काही ग्रामीण भागातील गावात संपूर्ण संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0
वाचा काय सुरू राहणार काय नाही
बीड – कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive) झालेल्या रुग्णाचा बीड शहर व ग्रामीण भागातील विविध गावात अनेकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क खूप मोठ्या प्रमाणात व आला असल्याचे दिसून आले आहे. त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार ०८ दिवसांसाठी ४ जून २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
कारेगांव ता. पाटोदा येथील रुग्ण हा कोरोना विषाणूची लागण झालेला आढळलेला असून बीड शहरातील त्याचे तपास करत असतांना त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क बीड शहरात खूप मोठया प्रमाणात व काही ग्रामीण भागात आला असल्याचेयाबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण बीड शहरात व बीड तालूक्यातील खंडाळा, च-हाटा, पालवण व इट , पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालूक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालूक्यातील खरमाटा व धारुर तालूक्यातील पारगांव या गांवामध्ये ०८ दिवसांसाठी  संपूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
तसेच या ८ दिवसांमध्ये ४ जून २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी कालावधीत घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

१.वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरु राहतील.

२. बीड शहरात व वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहरा बाहेरही जाता येणार नाही.

३. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खाजगी व बैंका इ.) बंद राहतील, परंतू बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना व बँक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांचेशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घ्यावी.

४. बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, पंरतू मेडीकल Emergencey मधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज www. covid19.mhpolice. in या वेबसाईटवर भरुन पास प्राप्त करुन घ्यावा.

५. बीड शहरातील व वरील गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे बंधनकारक राहील, कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे

आढळून आल्यास सदरील अॅप मध्ये Self Assessment या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी.

६. बीड शहर व वरील गांवे वगळता जिल्हयातील इतर सर्व भागांमध्ये या आधी दिलेले आदेशच कायम राहतील राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वीचे या कार्यालयाचे आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here