Georai : दगडाने ठेचून पत्नीचा खून; पतीला अटक

0
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – गेवराई येथे एका 65 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. आज गुरुवारी (दि.28) सकाळी ही घटना घडली. याप्रकणी पोलिसांनी संशयित पतीला अटक केली.

आशिकी गंगाबाई बप्पासाहेब घुले, असे मयत महिलेचे नाव असून बप्पासाहेब घुले असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी परिसरातील घुले पती-पत्नी राहात होते. आज सकाळी आशिकी यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासणीत संशयित आरोपी बप्पासाहेब घुले याला पोलिसांनी अटक केली असून हा मनोरुग्ण असल्याचे समजते. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here