Beed : दिलासादायक : कन्टेनमेंट व बफर झोन सोडून शहर व या 12 गावात संचारबंदीचे नियम शिथील; सकाळी ७.३० ते सध्यांकाळी ६.३० पर्यंत परवानगी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  
बीड – शहरातील व  १२ गावातील या पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासीतांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी अहवाल सादर केले आहे. त्यामुळे बीड शहर व या गावांमधील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथील करण्यात येऊन यापूर्वीचे आदेश पूर्ववत करण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व भागांना कन्टेनमेंट व बफर झोन (Cenatinament zone  and Buffer Zone) वगळून सकाळी ७.३० ते सध्यांकाळी ६.३० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
यामुळे २८ मे २०२० रोजीचे किराणा सेवा घरपोच पुरविणे, बँका, फिरते दुध विक्रेते, जार वाटर सप्लायर्स इत्यादी व अत्यावश्यक सेवेबाबत काढलेले तीनही आदेश रद्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी कारेगांव ता.पाटोदा येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा तपास करत असतांना त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क बीड शहरात व बीड तालुक्यातील खंडाळा, यहाटा, पालवण व इट, पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी,मादळमोही व धारवटा , केज तालूक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव या गांवामध्ये आढळून आल्यामुळे दिनांक ०४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत बीड शहर व वरील गांवामध्ये संचारबंदी लागू करण्यात येवून घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती, हे प्रतिबंधात्मक आदेश शिथील करण्यात आले आहेत.
परंतु कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्ण आढळलेल्या अनुषंगाने तालुका पाटोदा येथील कारेगांव हे गांव तसेच मोमीनपुरा- अशोकनगर, जयभवानीनगर, सावतामाळी चौक, संभाजीनगर बालेपीर येथील परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment Zone )म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तेथील प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.

बीड शहरातील रोशनपुर, बालेपीर येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू
बीड शहरातील रोशनपुर, गल्ली क्रमांक ०१ बालेपीर या काही संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे 

जिल्ह्यात दि. ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० यापर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) लागू करण्यात आले आहे. आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here