प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कर्जत : राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने राशीनकरांना पुन्हा धक्का बसला आहे. सदरची व्यक्ती मुळची राशीन येथीलच असून नुकताच पुण्यावरून प्रवास करून आली असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या चार झाली आहे.
राशीन (ता.कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती नुकतीच पुणे येथून प्रवास करून आपल्या मूळगावी परतली होती. मात्र गुरुवारी संध्याकाळी सदरच्या व्यक्तीस त्रास सुरू झाल्याने अहमदनगर येथे हलविण्यात आले होते. सदरच्या व्यक्तीच्या लक्षणावरून त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला असता ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाल्याने कर्जतचे स्थानिक प्रशासनास पुन्हा सतर्क झाले आहे.स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सदरील कोरोना बाधित व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली आहे.
याबाबत माहिती घेत असून खबरदारीचा उपाय म्हणून परिसर प्रतिबंधित करण्याची मोहीम आखली आहे. प्रथमत:च कर्जत तालुक्यातील व्यक्ती कोरोनाग्रस्त झाली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी मुळची मुंबई वाशी येथील ६५ वर्षीय महिला राशीन येथे आपल्या सुनेकडे आली असता तिचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांनतर तिच्या संपर्कात आलेल्या सहा वर्षाच्या नातीला तर मागील आठवड्यात सिद्धटेक येथील तुर्भे मुंबई येथून आलेल्या महिलेला सुद्धा कोरोना निष्पन्न झाला होता. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या चार झाली असून आता सर्वसामान्य नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.
राशीनकरासाठी ब्लॅक फ्रायडे