Jalna : जिल्ह्यात आणखी 6 व्यक्ती पॉझिटीव्ह तर यशस्वी उपचारानंतर 11 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – जिल्ह्यात आणखी सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर यशस्वी उपचारानंतर 11 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातून राज्य राखीव पोलीस बलगट क्रं 3 चे दोन जवान, नवीन जालना परिसरातील एका खाजगी रुग्णालयातील तीन कर्मचा-यांचा, पीरगैबवाडी ता. घनसावंगी येथील पाच व रांजणी ता. घनसावंगी येथील एका अशा एकूण अकरा कोरोनबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्यांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने दि. 30 मे 2020 या सर्वांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच दि. 30 मे, 2020 रोजी साईनगर जालना येथील एक, खापरदेव हिवरा ता. घनसावंगी येथील तीन, धावडा ता. भोकरदन येथील एक, नानसी पुनर्वसन ता. मंठा येथील एक अशा एकूण सहा जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सध्या रुग्णालयात 59 व्यक्ती भरती आहेत, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 13 एवढी तर एकूण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2632 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 6 असून एकूण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -123 एवढी आहे. एकूण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2466, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-347, एकूण प्रलंबित नमुने -39, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-11, यशस्वी उपचारानंतर एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-44, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-79, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 3762 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शून्य एवढी आहे.

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण 402 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असून यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-24,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -25, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-20, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -109 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कूल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद –12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -20, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-37, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –13 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -32, मॉडेल स्कूल मंठा-48, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापूर – 9, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभूर्णी -00 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत 699 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 135 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 621 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 603 असा एकूण 3 लाख 27  हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here