रिमझिम गिरे सावन ‘ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश गौर काळाच्या पडद्याआड…

0

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

‘ना बोले तुम ना मैने कुछ कहां’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘रजनीगंधा फुल तुम्हारे’, ‘कही दूर जब दिन ढल जाये’, ‘जिंदगी कैसी ये पहेली’, ‘जाने मन जाने मन..’ यांसारख्या सुमधुर गाण्यांचे गीतकार योगेश उर्फ योगेश गौर यांचे आज वसई येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली तसेच नातवंडे असा परिवार आहे.कवी व गीतकार योगेश यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे झाला.


ते १६ वर्षांचे असताना लखनऊवरून मुंबईला आले. त्यावेळी त्यांची गाणी हृषिकेश मुखर्जी यांनी ऐकली आणि त्यांना ‘आनंद’ चित्रपटासाठी संधी दिली.आनंदमधील त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली.त्यानंतर त्यांनी रजनीगंधा, मंजिल, इंग्लिश बाबू देसी मेम, छोटी सी बात, मिली, बातो बातो में, दुल्हारा, चोर और चांद, प्रियतमा, दिल्लगी अशा कित्येक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली.सलील चौधरी आणि त्यांची जोडी चांगली जमली होती.
सलील चौधरी यांच्याबरोबरच एस. डी. बर्मन, राजेश रोशन, आर. डी. बर्मन, निखिल-विनय अशा कित्येक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. शंभरहून अधिक चित्रपट आणि दोनशेहून अधिक मालिकांची शीर्षक गीते त्यांनी लिहिली. रजनी, टीचर अशा काही गाजलेल्या मालिकांची गीते त्यांनी लिहिली. अत्यंत मनमिळावू आणि सरळ-साधा असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी लिहिली.
मिली सिनेमातील आए तुम याद मुझे, छोटी सी बात सिनेमातील न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ आणि रजनीगंधा सिनेमातील कई बार यूं भी देखा है याशिवाय रिमझिम गिरे सावन सुलग जाए मन, न बोले तुम न मैने कुछ कहा, बडी सूनी सूनी है, जिंदगी ये जिंदगी अशी 70 च्या दशकातील अनेक सुपरडुपर हिट गाणी योगेश यांनी लिहिली आहेत.
दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी योगेश यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटलं की, ‘मला आताच असं कळलं की हृदयाला स्पर्श करणारी गाणी लिहिणारे कवी योगेशजी यांना स्वर्गवास झाला आहे. हे ऐकून मला खूप दु:ख झालं. योगेशजींनी लिहिलेली अनेक गाणी मी गायली आहेत. योगेश खूप शांत आणि मधुर स्वभावाचे होते. मी त्यांना विनम्र श्रद्दांजली अर्पण करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here