प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
तालुक्यातील खोपटी या ठिकाणी आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापवताना शेजारील पाईप गरम होऊन गॅसचा स्फोट झाला. यात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.30) घडली.
रंगनाथ एकनाथ परदेशी (वय 72), असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंगनाथ परदेशी हे आपल्या घरी अंघोळीसाठी दुपारच्या सुमारास चुलीवर पाणी गरम
करीत होते. शेजारी गॅस मांडलेल्या होता. पाणी तापत असताना शेजारच्या टाकीकडील पाईप केव्हा गरम झाला हे त्यांना कळालेच नाही. अचानक गॅसचा स्फोट झाल्याने त्यांचा जागीच भाजून म्रृत्यू झाला. तसेच घराजवळ असलेली मोटारसायकल जळून खाक झाली.
ही घटना परिसरात समजताच मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरूरकासार ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.