Beed : एफ.ए. क्यू. दर्जाचा शिल्लक कापूस शासनास हमी भावाने विक्रीसाठी १ ते ३ जून दरम्यान नोंदणी

0

वाचा कोठे करावी नोंदणी व आवश्यक बाबी

बीड – जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एफ. ए.  क्यू. (FAQ )दर्जाचा शिल्लक कापूस शासनास हमी भावाने विक्री करावयाचा आहे. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील बाजार समितीकडे दि.१ ते ३ जून २०२० या तीन दिवसाचे कालावधीत आपली प्राथमिक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन शिवाजी बढे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांनी केले आहे.

सदरची नोंदणी करतांना शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत, कापुस पिकाचा पेरा नोंद असलेला ७/१२ ची प्रत,बैंक खाते नंबरसाठी पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, स्वतःचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे देऊन, आपले कापसाची नोंदणी करावी. जमीन धारणा क्षेत्र,कापूस पिक पेरा इत्यादी मर्यादेत नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच शेतकन्यांनी शक्यतो स्वतःचा मोबाईल क्रमांक नांव नोंदविर्ताना नमुद करावा. एकाच मोबाईल क्रमांकावर अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करू नये.
नोंदणी कार्यक्षेत्रातील बाजार समितीकडेच करावी. एकापेक्षा जास्त वेळेस व अनेक बाजार समितीमध्ये नोंदणी करू नये. शासकिय हमी भावाने कापूस खरेदीसाठी ही शेवटची नोंदणी असुन दि.३ जून २०२० नंतर नोंदणी केली जाणार नाही व टोकन दिले जाणार नाही.
बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांचे वतीन शासकीय हमी भावाने कापुस खरेदी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा कापुस सुरळीतपणे व विना अडचण खरेदी व्हावा शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर जास्त काळ थांबण्याची वेळ येऊ नये यासाठी कापुस विक्री करणेस इच्छुक शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करुन नोंदणी अनुक्रमांकानुसार शेतकऱ्यांना मेसेज पाठवुन खरेदी केंद्रावर बोलावणे व टोकन वाटप करणे बाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
बाजार समितीकडे नोंदणीसाठी संबंधित शेतकर्यांने स्वतः आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून प्राथमिक नोंदणी करुन घ्यावी व नोंदणी केलेची पावती व नोंदणी क्रमांक कृषि उत्पन्न बाजार समितीकडून हस्तगत करावा.
तसेच सदर क्रमांकानुसार बाजार समिती मार्फत संबंधित शेतकरी यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज/फोनद्वारे कापुस विक्रीचा दिनांक, वार, वेळ व केंद्राचे नांव कळविण्यात येईल, त्यानुसार दिलेल्या केंद्रावर कापुस विक्रीस आणण्यात यावा.
शेतकऱ्यांनी कोव्हीड-१९ विषाणु प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर नोंदणीसाठी येतांना व कापूस विक्रीस येताना सामाजिक अंतर राखणे, मास्क वापर करणे व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस शासकीय हमी भावाने खरेदी करणेसाठी प्राथमिक नोंदणी करण्यात आलेली आहे व त्यानुसार प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकर्यांचाच कापसाची
खरेदी सध्या चालू आहे.
तथापी,जिल्ह्यातील काही शोलकरी प्राथमिक नोंदणीपासून वंचित राहिलेले असल्यामुळे त्यांना शासकिय खरेदी केंद्रावर कापुस विक्री करणेसाठी अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांकडून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here