Karjat : राशीनकरांची कोरोना सोडेना पाठ, रविवारी आणखी दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : राशीन येथील परवा ५३ वर्षीय कोरोना बाधित यांच्या संपर्कातील रविवारी अजून दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कर्जत येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या एकूण आठ झाली आहे. राशीन येथील परिसर शुक्रवारी रात्रीच प्रतिबंधित करण्यात आला असून वाढत्या कोरोना रुग्णांने राशीनकराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर सहा वर्षाच्या राशीन येथील नातीने कोरोना लढाई जिंकत सुखरूप आपल्या घरी परतल्याने दिलासा मिळाला आहे. 

पुणे येथून प्रवास करून आलेल्या मूळचे राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह निघाला होता. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकूण १४ व्यक्ती नगरला पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली होती. यापैकी शनिवारी दुपारी ८० वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन आणखीच सतर्क झाले होते. रविवारी पुन्हा आणखी दोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राशीनकराची आता चांगलीच झोप उडाली आहे. आज १२ वर्षाच्या मुलाचा आणि १६ वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने राशीन येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची एकूण संख्या सात झाली असून सिद्धटेक येथील एक कोरोनाग्रस्त महिला मिळून एकूण आठ कोरोना रुग्ण कर्जत तालुक्यात आढळून आले आहेत.
राशीन येथील संपर्कातील उर्वरित दहा व्यक्तीचा अहवाल रात्री उशिरा निगेटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. त्या दहा व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने राशीनकरासाठी मोठा दिलासा ठरला असून नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे यासह खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here