प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
माळवाडगांव – परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील हरेगांव रोडलगत असणाऱ्या कावरे वस्तीवर बिबट्याने गोठ्यातील गाभन शेळीवर झडप घालून शेळी ठार केली. विठ्ठल सारंगधर कावरे यांच्या वस्तीवर ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, माळवाडगांव शिवारातील हरेगांव रोडलगत गट नं.५७ मध्ये विठ्ठल कावरे यांची वस्ती असून तेथे असणाऱ्या गोठ्यात दोन शेळ्या व एक बोकड बांधलेले असतांना आज (दि.१) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात हल्ला करुन त्यातील एका गाभन शेळीचा फडशा पाडला. त्यानंतर बिबट्या शेजारील ऊस पिकात पसार झाला. त्यानंतर ही घटना लक्षात आल्यानंतर कावरे यांनी शेळीचा शोध घेतला असता, बिबट्याचे ठसे दिसून आले. त्यानुसार शोध घेतला असता मृत शेळी जवळच असलेल्या उसाच्या कडेला मिळून आली.
त्यानंतर ही घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर वनरक्षक लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृत शेळीचा पंचनामा केला. या भागातच बिबट्याचा सतत वावर वाढून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. कावरे वस्ती परिसरातील ही तिसरी घटना घडली आहे. वन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेऊन माळवाडगांव परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
liquid tadalafil – site tadalafil 20