Crime: न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतरही तडीपारी… राजकीय द्वेशातून कारवाई ः भावेश राऊत यांचा आरोप

0

राष्ट्र सह्याद्री

नगर: “गेल्या अनेक दिवसापासून मला कोणत्या ना कोणत्या कारणाने टारगेट करुन त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. माझ्यावरील गुन्हयात न्यायलयाने मला निर्देश मुक्त केले असतानाही त्याच गुन्हयाचा आधार घेऊन राजकीय द्वेषामधून हद्दपारीची कारवई माझ्यावर होत आहे” असा आरोप भावेश राऊत यांनी केला असून त्यांनी थेट अप्पर पोलिस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागीतली आहे.

राऊत यांनी निवेदनात म्हंटले आहे की, मी नगर शहरामध्ये 32 वर्षापासून राहत असून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहे. मला दि.26 एप्रिल रोजी जी हद्दपारीची नोटीस मिळाली त्यामध्ये गुन्हे क्र.1,5,7 या गुन्हयामध्ये न्यायलयाने निर्दोष माझी मुक्तता केली आहे.

मात्र, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मला जीवे मारण्याची धकमी दिली होती. बोराटे यांचे भाचे सुयोग सुपेकर हे पोलिस उपविभागयी अधिकारी कार्यालयात सेवेत आहेत. सुपेकर राजकीय नातेवाईकासाठी काम करतात ते जे काम करतात ते पोलिस खात्याच्या विरुध्द आहे. यांची चौकशी शहर विभागाचे पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी करावी अशी आमची मागणी आहे. सर्व सत्य या चौकशी बाहेर येईल असा आमचा विश्‍वास आहे.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून मला व माझ्या कुटुंबाला धोका असुन आमच्या जिवीताला काही झाल्यास याला पुर्णपणे बोराटे हेच जबाबादार असतील, मी सुशिक्षीत नागरीक असून माझी पत्नी डॉक्टर आहे. तसेच सासरे लोकप्रतिनिधी आहेत. माझ्यावरील जे काही गुन्हे दाखल झाले होते ते सर्व राजकीय द्वेषापोटी आहेत. तसेच पाच ते सहा गुन्ह्यात मला न्यायालयाने निर्देष मुक्त केले आहे. तरीही त्या गुन्हयाचा सहारा घेत माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे राऊत यांनी निवेदनात म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here