अलताफ शेख । राष्ट्र सह्याद्री
अकोले : तालुक्यात आज तब्बल सहा रुग्णाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला असुन तालुक्यात रूग्णाची संख्या १८ झाली आहे. तालुक्यात मुंबईतुन येणारांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने तालुक्यातील चिंतेत वाढ होत आहे.
तालुक्यात घटकोपर मुंबई वरुन जांभळे येथे आलेल्या पॅाझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील ४८ व २४ वर्षीय दोन महिला व २८ वर्षीय परुष असे तिन व वाघापुर येथे मुंबई वरुन आलेल्य रुग्णाच्या संपर्कातील ३२ व ४० वर्षीय दोन महिला व ४५ वर्षीय पुरुष असे तिन रुग्ण मिळून एकुण तालुक्यातील ६ रुग्णाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला असुन तालुक्यात रुग्णांची एकुण संख्या १८ झाली आहे .